ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड्स…

atm frauds complaints
Spread the love

ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड्स…©अनिकेत परशुराम आपटे,

एस.व्ही.सी. बँक मुंबई.मंडळी, काल बँकेत एक प्रसंग घडला ज्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो…

काल सकाळी एक माणूस आला. म्हणाला, की काल म्हणजे सहा तारखेला त्याच्या खात्यातून बावीस हजार रुपये कमी झालेत.

मी खातं तपासलं तेव्हा लक्षात आलं की ATM कार्डद्वारे दहाजार, सात हजार आणि पाच हजार अशा रकमा त्याच्या खात्यातून काढल्या गेल्या होत्या कदाचित त्याच्या सोबत ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड झाला असावा.

मी त्याला तसं सांगितलं तर आपलं ATM कार्ड मला दाखवत तो म्हणाला की ते कार्ड त्याच्याचकडे आहे मग

ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड झालाच कसा आणि त्याने हे पैसे काढले नाहीत…माझं कार्ड माझ्याचकडे असताना असे पैसे कसे निघतील… कुठल्या माणसाने चोरले… कुठे आहे तो माणूस… असे प्रश्न तो इसम विचारू लागला. त्याचा स्वर जरासा चिडलेलाच होता जे सहाजिकच होतं.

आम्ही त्याला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला आणि तक्रारीचा नंबर असलेला कागद म्हणजे FIR copy इथे आणायला सांगितली. “माझे पैसे परत मिळतील की नाही ते सांगा…”

तो अधिकच रागात बोलता झाला. यावर आमच्यापैकी कोणाकडेच उत्तर नव्हतं. त्याची तडफड आम्हाला समजत होती पण बँकेच्या प्रकियांच्या अंमलबजावणीखेरीज आम्ही काहीच करू शकत नव्हतो…

मंडळी ATM Frauds आजकाल सर्रास होऊ लागलेत. ए.टी.एम. कार्ड सुरुवातीला बँकेत असतं हे खरं आहे. पण तेसुद्धा दोन कर्मचाऱ्यांच्या आखत्यारीत ठेवलेलं असतं.

ग्राहकाला कार्ड देताना पाकीट पूर्ण सीलबंद आहे ना याची खात्री करूनच कार्ड दिलं जातं. शिवाय मोबाईलवर आलेला ओ.टी.पी. (One Time Password) प्रविष्ट केल्याशिवाय कार्ड सुरूच होत नाही. म्हणूनच ते कार्ड नेहमी खातेदाराच्याच हातात दिलं जातं.आता ATM Frauds कसे होऊ शकतात याबद्दल थोडंसं…

ATM कार्डाच्या मागच्या बाजूला एक काळी पट्टी असते. त्या पट्टीत खात्याची माहिती असते. ती पट्टी जर कोणाच्या हाती लागली तर तिचा गैरवापर होऊ शकतो.

कधी कधी स्वाईप करण्यासाठी कार्ड आपल्याकडून घेतलं जातं आणि जरा लांब जाऊन ते स्वाईप केलं जातं.

एखाद्या अजाणत्या वेबसाईटवर कार्डाचा तपशील दिला जातो.

नेमका गडबडीच्या वेळी ओ.टी.पी.ची विचारणा करणारा एखादा फोन येतो आणि ओ.टी.पी. दिलाही जातो.

आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे कार्ड आणि पिन सुपूर्द केले जातात पैसे काढण्यासाठी.अनेक ठिकाणी ATM मशीनमध्ये काही यंत्र बसवली असतात ज्याने कार्डाचा तपशील चोरता येतो आणि ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड करता येतो…मंडळी, बँकांमध्येही काही गैरव्यवहार चालत असतीलही.

पण सर्व बँका आणि त्यांचे कर्मचारी, ग्राहकांना मिळणाऱ्या या सेवांबद्दल योग्य ती आणि शक्य तितकी दक्षता बाळगून असतात.तरीही ग्राहकांनीही पुरेपूर काळजी घ्यावी. लक्षात घ्या;

ATM कार्ड म्हणजे तुमचं खातं नव्हे तर खात्यात असलेला तुमचा पैसा आहे. तेव्हा, ATM मधून पैसे काढताना आधी ते ATM चेक करा.कार्ड आत सरकवण्याआधी दोन वेळा “Cancel” हे बटण दाबा.दुसऱ्या कोणालाही पैसे काढण्यासाठी आपलं कार्ड आणि पिन देऊ नका.कार्ड स्वाईप होताना ते आपल्या नजरेसमोरच होईल असं बघा.ATM मध्ये किंवा स्वाईपच्या वेळी पिन टाकताना आपल्या खेरीज तो कोणालाच दिसणार नाही याची काळजी घ्या.


कुठल्याही अनोळखी साईटवर कार्डाचा तपशील देताना नीट विचार करा…


यांमुळे ATM Frauds बंद होतील असं नाही पण कुठेतरी त्याला लगाम नक्कीच बसेल…


लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा©अनिकेत परशुराम आपटे, एस.व्ही.सी. बँक मुंबई.

 

Comment Time...!