त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे..

Spread the love

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे…

©सौ.वैष्णवी व कळसे

Ignore करने शिकलं पाहिजे, जेव्हा कोणी त्याच्या पदाचा, वयाचा, आणि आपल्या शांत राहण्याचा फायदा घेऊन त्याचच खरं करणार असेल, आणि आपल्याला बोलण्यात मर्यादा येत असेल अशा वेळेस आधीच “हो तुझच बरोबर म्हणावं, आणि सोडावा तिथेच विषय कारण त्याच्या पातळीवर जाऊन आपण नाही बोलू शकणार, आणि सवयी प्रमाणे तो हरायला लागला की सर्वांची सिम्पथी घेणार…

इमोशनल नाटक करणार actually ज्या विषयावरून हे वाद होते ते ठेवणार बाजूला आणि नौटंकी करून त्याचंच खरं करणार….. बस हजर असलेले आपल्याला शिकवायला येणार… मग नेहमीप्रमाणे आपण वाईट होणार… त्यापेक्षा त्याला जर आपण ओळखलं असेल तर त्याची पातळी पण ओळखायची आणि ignore करायचं….. त्याच्या एवढं घाण नाही बनू शकत आपण शेवटी…. आपण कधी कोणासाठी वाईट चिंतत नाही कोणाला गरज असेल तिथेही आपण त्यांना मदत करायला मागे पुढे बघत नाही… मग आपल्याला ओळखून सुद्धा समोरचा आपल्या शांततेचा फायदा घेत असतो.. त्या व्यक्तीला सवयच असते, तो व्यक्ती “लंका जले, हनुमान बाहर” अशा प्रकार चा असेल तर अशा वेळेस तो कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यापेक्षा ती वेळ टाळून न्यावी आणि त्याच्याशी त्या विषयावर बोलण्यापेक्षा walk out करने कधीही योग्य…. अशी माणसं स्वतः अशी परिस्तिथी घडवून आणतात आणि म्हणतात की “आम्हांला यातलं काहीच माहिती नाही, आत्ताच कळतंय हे सर्व” अशा प्रकारचा drama करणं त्यांना खूप छान जमतं… कारण आजपर्यंत त्यांनी त्यांच्या आयुष्यात हेच सर्व केलेलं असतं…. कोणी अडचणीत दिसलं की मुद्दामून तिथे जाऊन त्याला बळजबरी मदत करणार म्हणजे त्याला आपल्या उपकाराखाली दबाव आणता येईल… आणि मदत केली म्हणजे तो माणूसच विकत घेतल्यासारख त्याला मानसिक त्रास देणार… ह्यांना आसुरी आनंद हवा असतो, जेवढं कोणाचं वाईट होईल तेवढाच या लोकांना आनंद होतो….. जगासमोर ही माणसं वाईट होत नाहीत, आपल्याला त्रास देऊन सुद्धा जगासमोर आपल्याला वाईट ठरवण्यात एक्दम हुशार असं व्यक्तिमत्व असतं अशा लोकांचं….

ही लोकं स्वतःच्या हिमतीवर नाही तर फक्त सिम्पथी घेऊन किंवा ग्रुप धरून राहतात…… एकटं पाडून टार्गेट करणं जमतं फक्त यांना कारण मनातून ही लोकं स्वतःच्या नजरेत सुद्धा फार मोठी नाहीत… पण सर्व असूनही स्वतः सुखी नाही, त्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य खराब करतात….एखाद्याच्या आयुष्यात सुख सुविधा नसेल तर त्यांचं असं वागणं आपण समजू शकतो, पण सर्व सुख सुविधा उपभोगणारा सुद्धा अशा मानसिकतेचा असतो हे समजणं आपल्यासाठी थोडं कठीणच असतं… ही एक प्रकारची विकृती आहे, की त्याला सर्व हवं आहे पण ते आणखी कोणाकडे दिसलं की त्याला त्रास होतं आणि लागतो फालतूपणा करायला…. म्हणून अशा लोकांना आपल्याला इग्नोर करता येणे खूप महत्वाचे आहे….. खोटं बोललेलं एकदाच चालून जातं हो आपल्या माणसात, पण खोटं वागणं नाही चालू शकत.. कारण बरेचदा खोटं यासाठी पण बोलण्यात येत की कोणी दुखावू नये, पण खोटी वागणूक मात्र फक्त जाणीवपूर्वक ठरवून केलेली असते, समोरच्याच्या भावनांशी खेळण्यासाठी… please be careful from fake peoples…”क्यून्की इनको किसीको जितना नही है, सिर्फ हासील करना है”

©सौ.वैष्णवी व कळसे
टीप:

लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत.

शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावानेच शेअर करावा.

#Facts #solutions #problem #marathifacts #trend #trending #psychology #life #lifeisgood #lifegoals #fastlife #frustrated #frustration #failure #success #ShareWithPride #amhimarathi #marathi #marathimulgi

Comment Time...!