सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक – The Difference Between Advice and Guidance..

Spread the love

सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक !

©सौ. वैष्णवी व कळसे

 

कसं ओळखायचं मार्गदर्शक आणि सल्ला देणाऱ्यांना?

कुठली गोष्ट करायची ठरवल्यावर त्यातलं सर्व कळत असून देखील निर्णय घेताना सल्ला किंवा मार्गदर्शन घेतलंच पाहिजे!

सर्वात आधी या दोन्ही शब्दांमधला फरक लक्षात घ्यायला हवा…..

सल्ला:-

जो कधीही कोणीही कोणाला देताना दिसतं, कारण तिथे पैसे कुठे लागतात? फुकटची गोष्ट म्हटल्यावर देणारच ना!

जसं की आपण कुठली गोष्ट केली की त्यावर म्हणणार “अरे यापेक्षा ते का नाही केलस?” नवीन मोबाईल घेतला की “यापेक्षा तर तो किती भारी होता परवडला नाही तुला” किंवा कुठली वस्तू नवीन घेतली की तुम्हाला कसं त्यावर पश्चाताप होईल अस काहीतरी बोलने…

आपण काहीही करायचं ठरवू देत बरोबर त्याउलटच सांगणार की कसं त्यापेक्षा दुसरं चांगलं आहे…..

कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना अर्धवट गोष्टी ऐकून किंवा बघून आपल्याला ते करायला सांगणे म्हणजेच सल्ला देणे…. घेतलेला निर्णय कसा चुकला हे दाखवणे म्हणजेच सल्ला देणे…

आपलं कोणाशी सुरु असलेलं conversion ऐकून पूर्ण विषय न जाणून घेता त्यावर काय करायला पाहिजे हे शिकवणे म्हणजेच सल्ला देणे…..

मार्गदर्शन:- 

एखाद्याला कुठली गोष्ट करायची म्हटल्यावर नक्कीच त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते व ते मार्गदर्शन घेन्यासाठी व्यक्ती देखील जवळची असावी लागते, व अनुभवी असावी (वयानुसार अनुभव नव्हे), तसेच शुभचिंतक सुद्धा असावि लागते…..

आता बघूया मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय?

काहीही करायचे ठरवल्यावर त्यातले फायदे व नुकसान समजवून सांगणे, त्यासाठी काय काय करावं लागेल, ती गोष्ट करताना कुठल्या अडचणींना समोर जावं लागू शकतं ते देखील बघायला सांगणे… म्हणजे मार्गदर्शन!

आपली काय काय तयारी आहे त्यासाठी व आणखी काय केल्याने ही गोष्ट चांगली बनू शकते? त्यासाठी पुरेशी आपल्याकडे माहिती आहे का? अशाप्रकारे समजवणे म्हणजे मार्गदर्शन करने…. प्रत्येक गोष्टीची दोन्ही बाजू समजवणे म्हणजेच मार्गदर्शन करने….

बघूया मार्गदर्शक आणि सल्ला देणार्यातला फरक….

माझ्यामते..

 1. जे अर्थपूर्ण सांगतात ते मार्गदर्शक आणि जे निरर्थक बोलतात ते सल्ला देणारे….
 1. जो दोन्ही बाजूने विचार करून समजावण्याचा प्रयत्न करतो तो मार्गदर्शक…
 2. जो तात्पुरता काहीतरी बोलून मोकळा होतो तो सल्ला देणारा….
 3. जो आपला आत्मविश्वास वाढवतो तो मार्गदर्शक…..
 4. जो आपण कसं सारखं चुकतो केवळ हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो तो सल्ला देणारा…..
 5. चुकल्यावर सुद्धा कशी ती चूक दुरुस्त करू शकतो हे समजवणारा मार्गदर्शक…..
 6. दुसऱ्यांशी तुलना करून आपल्यात काय काय कमी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तो आपला मार्गदर्शक असूच शकत नाही….
 7. दुसऱ्यांचे उदाहरणं देऊन आपल्याला प्रोत्साहित करतो व आपले कोणते प्लस पॉईंट्स आहेत ते दाखवून आपलं मनोबल वाढवतो तो मार्गदर्शक…..
 8. समोरच्याचे न ऐकून घेता आपलं मत त्याच्यावर लादतात ते सल्ला देणारे….
 9. आपली आवड, इच्छा लक्षात घेऊन आपण काय काय करू शकतो याची क्षमता आपल्या लक्षात आणून देणारे म्हणजेच मार्गदर्शक……
 10. आपल्याकडून चूक झाल्यावर “मग मी सांगितलं होत न नको करू म्हणून?, आता बस बोंबलत”, असं बोलून discouraged करणारे मार्गदर्शक नक्कीच नाही……
 11. आपण चुकल्यावर देखील शांतपणे “अरे ठीक आहे न, झाली चूक काढूया काहीतरी मार्ग” असं बोलून स्थिर बनवण्याचा प्रयत्न करणारे म्हणजे मार्गदर्शक…..
 12. मला वाटतं, विचारल्याशिवाय कोणाला उगीच सल्ला द्यायला जाऊ नये, कधी कधी कोणाचा सल्ला एखाद्याच्या आयुष्यात हस्तक्षेपाचं काम करून जाऊ शकतं…..
 13. समोरच्याने आपल्याला ती जागा दिली आहे का एवढं हक्काने सांगायची की, उगीच स्वतःहून कुठल्या विषयात मध्ये जाऊन सांगतोय ते बघायला हवं नाहीतर option नाही म्हणून आत्ता तर ऐकून घेतील व मनात आपला राग धरल्या जाऊ शकतो…..

त्यासाठी परक्यांमध्ये लपलेले आपले व आपल्या मध्ये लपलेले परके ओळखणे खूप आवश्यक आहे.

हे फक्त माझे मत आहे, कदाचित चुकू पण शकतं…. कुठे चुकल्यास माफी असावी….

©सौ. वैष्णवी व कळसे

3 Replies to “सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक – The Difference Between Advice and Guidance..

 1. Keep it up mam….really very useful information….I use it in journey of my life…

Comment Time...!