तात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution

Spread the love

तात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution

©सौ. वैष्णवी व कळसे

 

आपल्याला रोजच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात… त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मनाने strong किंवा weak बनवत असतो….

कधी कधी प्रॉब्लेम असतो छोटासा आणि त्यावर विचार केल्या जातो जास्त…. लहानशी कुठली गोष्ट घडली कि लगेच आपण त्याला irritate होऊन permanent सोलुशन काढायला निघतो….. आणि त्यावर एक वाक्य तर असतंच आपलं “कटकटच नको परत”…. प्रत्येक गोष्ट “आर या पार नसते” मधला मार्ग देखील निवडणे योग्य ठरु शकतं कुठली situation आपण aggressively हाताळण्यापेक्षा politely हाताळून बघायला हवी….

कधी कधी काही गोष्टी वेळेवर सोडून देणेच योग्य असते…. आजचा प्रॉब्लेम पुढेही असणार, असं मनाशी पक्क करून आपण बसतो आणि मग त्यासाठी उगीचच डोकं लावत बसतो…. ज्या डोक्यात काही innovative कल्पना यायला पाहिजे, नवीन काही करून बघायच्या idea’s, स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी, समाधान देणाऱ्या गोष्टी, हे सगळं यायचं सोडून आपण घेऊन बसतो तो एकच प्रॉब्लेम….

आणि जेव्हा तो प्रॉब्लेम सुटतो, त्यावेळेस आणखी दुसरा दारातच उभा असतो…मग नेमकं आपण जगायचं कधी? आता त्याही दुसऱ्या प्रॉब्लेम ला उभं आपणच केलं असतं… कारण बाहेरून शांत दिसणारं आपण मनात अनेक वादळांशी लढत असतो…. कामापेक्षा जास्त विचार करून आणखी दुसरं काय होणार?

प्रत्येक अडचणींचा गुंता आपण नाही सोडवू शकत हे आधी समजायला हवं…… कोणाशी share करावं वाटलं तर ते ही करावं पण उगीच लहानसं काही झालं कि त्यावर सतत विचार करून स्वतःला आणि आपल्या सोबत दुसऱ्यांना ही त्रास देणं बरोबर नाही….. आता राहिला प्रश्न share करायचा तर त्यातही अनेक प्रश्न असतात कि विश्वासाचं आपलं माणूस लागतं बोलायला…. ती हक्काची व्यक्ती म्हणजे आपलं चुकलं तरी हो तुझचं बरोबर काय ती चूक समोरच्याची म्हणणारी असेल तर ती व्यक्ती share करण्यायोग्य नाही….

राजकारणी लोकांसोबत कसं deal करायचं हे समजलं पाहिजे… कारण आपण अशा प्रकारच्या लोकांमध्ये राहतो जे आपल्याशी तर गोड बोलतात आणि आपल्याबद्दल दुसरीकडे मात्र… असो हा विषय तर बराच खोल असतो…. माझ्यामते जर जास्त तणाव आल्यासारखं वाटत असेल तर आपल्या भावना कागदावर उतरावाव्या कारण कागद त्याचा स्क्रीनशॉट नाही काढत…..आपल्याला खंबीर व्हायचं असेल तर प्रत्येक प्रॉब्लेम दुसऱ्यांच्या सांगण्यावरून सोडवण्यापेक्षा स्वतः विचार करायला हवा कि जी situation मी face करतो त्यात कसं वागायला हवं ह्यात दुसऱ्याचं मत घ्यायची काय गरज……

दुसऱ्यांच्या सांगण्यावरून स्वतःच आयुष्य जगणे हे तर काही बरोबर नाही… कोणाच्या हातातली कठपुतळी बनून जगण्यापेक्षा आपल्याला जे योग्य वाटतं ते केलेलं बरं… ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यावर विचार करून स्वतःला त्रास देण्यापेक्षा काळावर त्या गोष्टी सोडलेल्या बऱ्या……

“कल कि फिक्र हमसे हमारा आज छिन ले जाये, तो क्या फायदा ऐसी फिक्र का”….. मनमोकळे पणाने जगले पाहिजे… जे होणार आहे ते समोर आल्यावर वर बघू असं स्वतःला समजावता आलं पाहिजे… एखाद्या situation च्या मागे पळून सोलुशन काढायचा प्रयत्न करण्यापेक्षा ती जेव्हा समोर येईल तेव्हा बघू असंही स्थिर होता आलं पाहिजे…

काही चुकलं असल्यास माफी असावी

संकलन:- सौ. वैष्णवी व कळसे 

(सत्य घटने वर आधारित कमीतकमी जे मी मागच्या नौ वर्षांपासून पाहत आली आहे ) यासाठी कोणाला हि काही हि अडचण असल्यास ९८२३६८९८८४ या नंबर वर संपर्क करा)

 

#Facts #solutions #problem #marathifacts #trend #trending #psychology #life #lifeisgood #lifegoals #fastlife #frustrated #frustration #failure #success #ShareWithPride #amhimarathi #marathi #marathimulgi

Comment Time...!