जिंदगी का सफर….

Spread the love

      जिंदगी का सफर….

©सौ. वैष्णवी व कळसे

 

जीवनाच्या या प्रवासात आपण अनेक चड उतार बघितले असतील…

काही चांगल्या तर काही नको असलेल्या आठवणीही असतील…

आठवणींचं न कामच निराळं असतं…

आनंदाचे क्षण आठवले कि वाटतं जसं काही कालचीच तर ही गोष्ट… आणि दुःखाचे दिवस आठवले कि लगेच परत ते दुःख ताज होतं…

म्हणजे ही एक अशी मेमरी आपल्याला मिळाली आहे ज्याची लिमिट नाही… जणू एखादी Hard Disk🗄️

आपण थोडंस लक्ष देऊन बघितलं तर ही गंम्मत लक्षात येईल…

कि आपल्या फोन📱 मध्ये असलेली Ram-Rom किंवा Computer 🖥️ मध्ये असलेली Hard Disk📀  सगळ्या फाइल्स 📤📥 ने Videos ने Photos 🎥 ने आणि Unwanted Stuff  🧰 ने भरलेली असते…

ज्यात कामापेक्षा निरुपयोगी गोष्टींचा समावेश जास्त असतो…

ज्यामुळे आपला फोन वा 🖥️ कॉम्प्युटर Slow होतो Hang होतो…

पुढचे कुठलेच कामं नीट करू शकत नाही… तसंच आपलं असतं…

आपल्याही डोक्यात अनेक वाईट आठवणी, द्वेष, ईर्षा भरलेली असते…

कोणी दिलेला त्रास असतो…

तो त्रास एक असतो जो सतत आठवून अनेकदा आपणच स्वतःला देतो…

समोरच्याच कामच आहे आपल्याला त्रास देणं, आपल्या कामात अडथळे निर्माण करणं, तो त्याच्या कामात यशस्वी केव्हा होतो जेव्हा आपण स्वतःला त्या गोष्टींचा त्रास करून घेतो…

त्यामुळे जगातल्या 🎊🎀🖼️🌹🌴सुंदर, Useful ✒️🖍️📤, Memorable  गोष्टी सोडून या सगळ्या चुकीच्या गुंत्यात अडकून बसतो व hang होतो…

त्यामुळे पुढे करायचे कुठलेही काम आपण नीट करू शकत नाही…

तुमच्या प्रयत्नांनी सुद्धा कामं नीट झालं नसेल तर हरकत नाही…

पण तुमच्या डोक्यातल्या भूतकाळाच्या गुंत्यामुळे ➿ तुमचे कामं होऊ शकत नसेल तर कुठेतरी आपल्याला बदलायची गरज आहे…

एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे कि जो आपला आज आहे उद्या तो ही भूतकाळाचा भाग होईल…

पण पूर्ण आयुष्य फक्त रडगाण्यात, दुःखात, चिडचिडीत घालवायचं का?

समोर आठवण्यासाठी फक्त अशाच आठवणी ठेवायच्या का?

त्यापेक्षा कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ओळखलं पाहिजे व त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजे…

तेव्हाच आपल आयुष्य सुखी व सुंदर बनेल….

आपल्या मध्ये असलेला Unwanted stuff delete करावा, सुखाचे फोल्डर्स 📂📁 बनवावे, काही न विसरण्यासारखे दुःख असतील तर त्याची Zip File करावी… 

आणि स्वतःलाच एक वचन द्यावं कि माझ्या काल मुळे तुझा आज मी खराब होऊ देणार नाही…😊😊

 

©सौ. वैष्णवी व कळसे

#मराठीतच #मराठी #marathi #trending #trendingnow #relationships