गरज नात्यांची -Need of Relationship ©सौ. वैष्णवी व कळसे

Spread the love

गरज नात्यांची

©सौ. वैष्णवी व कळसे

जगात सर्वात स्वार्थी कोणी असेल तर तो फक्त माणूस….

जगात काही माणसं अशे असतात ना की त्यांना काम असलं की गोड बोलायला जमतं.

अचानक छान छान वागायला जमतं, गरज असली की कोणाची तब्बेत कशी आहे ह्याची देखील चौकशी व्हायला लागते त्यांच्याकडून, खूप आठवण येत होती अशात असं नाटक करायला जमतं….

काळजी घेत जा बरं का, नीट खात पीत जा, किती डोळे खोल गेले तुमचे, किती विकनेस आलाय तुम्हाला, चेहरा किती बारीक दिसतोय, असं काळजीचे शब्द बोलून दाखवायला जमतात…

आणि तेच संपू दे गरज…

लगेच भाषा बदलते, ते म्हणतात ना गरज सरो, वैद्य मरो….. बस तसंच….

कोणी आपल्या emotions चा असा फायदा घेत असेल तर थोडं आपणही आता बदलायला हवं……

अशा लोकांना मी एवढंच म्हणेल…

Whenever you lie to someone who love’s you, care for you.

Don’t think that they are fools to believe you, they hide their feelings because they don’t want to disappoint you…

जिथे आपली कदर नसते तिथे स्वतःहून किम्मत शून्य करून घेऊ नये…

Tolerate न करायच्या गोष्टी पण tolerate करत गेलो की समोरच्याच वागणं आणखी स्ट्रॉंग बनतं….

जेव्हा कुठली चुकीची गोष्ट घडत असेल तिथे बोलून दाखवलंच पाहिजे…

एक गोष्ट आपण नेहमीच ऐकत असतो, “चोराची एक छोटीशी चोरी जमली, की आणखी मोठा हाथ मारायची त्याला हिम्मत येते, ते जमलं की आणखी चुकीच्या गोष्टी होतात, मग तर कोणाला ठार मारायला पण भीती वाटत नाही त्यांना…

पण तेच पहिल्या चोरीच्या वेळेसच शिक्षा मिळाली असती तर एवढा मोठा अपराधी बनला नसता….

तसंच, बरेचदा लहान मुलांनी काही चुकीचं बोलल्यावर आई वडील त्यावेळेस कौतुक करतात, टाळ्या वाजवतात, त्यांना वाटतं अजून लहान आहे आणि त्या गोष्टी कोणत्या पाहुण्यांसमोर केल्या की लागतात त्या लहान मुलांना मारायला…

ह्यात त्या लहान मुलाला मारण्यापेक्षा चुकलं तेव्हाच समजवलं तर गरज नसती मारायची….

ह्यातून एकच लक्षात येत ते म्हणजे चुकीच्या गोष्टी सहन केल्यामुळे चुकीचं वागणाऱ्याला आणखी confidence येतो, आणि तेवढंच पुरेसं आहे आणखी नवीन चूक करायला….

अशा लोकांना आपली आठवण फक्त रिकाम्या वेळेत किंवा गरजेला येते….

पण जेव्हा वेळ येते एन्जॉय, मज्जा, मस्ती करायची त्यावेळेस ह्यांची निवड दुसरी लोक असतात जे फक्त त्यांचा वापर करणारे असतात…..

ह्यालाच म्हणतात ना जग गोल आहे.. जसं आपण कोणासोबत करू तसंच आपल्यासोबत कोणी करेल….माणसाचं,”कामापुरता मामा, ताकापुरती आजी….

“हे लॉजिक त्यांनाच डुबवेल नक्की… त्यामुळे माणसं ओळखून वागणे जमले पाहिजे आजच्या काळात तरी….

काही चुकीचं वाटल्यास माफी असावी

©सौ. वैष्णवी व कळसे 

#मराठीतच #मराठी #marathi #trending #trendingnow #relationships