कहाणी एक कुकर की …

Spread the love

कहाणी एक कुकर की … 🤣

©Nandini Nitesh Rajapurkar

दोन शेजारणी भाजी आणायला निघतात. एकीच्या घरी पाहुणे जेवायला येणार असल्याने तिला झटपट होणारी भाजी घ्यायची असते.
दोघी बाजारात जायला निघतात.
पहिली- काय मग कसली गडबड? 🤗
दुसरी- काही नाही गावाकडून पाहुणे आलेत ना त्यांच्या साठी छोले पुरी बनवायचा बेत आहे. म्हंटल छोले आणावेत.🙂
पहिली- अच्छा… मज्जा आहे बुवा पाव्हण्यांची..!! 😍
दुसरी- हो भाजी बनवली की तुम्हाला पण देते पाठवून..😘
पहिली- हो चालेलं ना…बाकी स्वयंपाक पण झाला का? 😚
दुसरी-हो होईल आता. बहीण पण आलीये घरात लांबची, तिला म्हंटल आधी भात वरण बनवून घेऊ. आपण येई पर्यंत कुकर होईल.
डाळ- तांदूळ दिलेत तिला काढून लावला असेल तिने कुकर… 😊
पहिली- चला मग पटकन जाऊन येऊ. ☺️
झटपट भाज्या घेऊन दोघी दाराजवळ पोहोचतात न पोहोचतात तोच,
दुसऱ्या शेजारणीला तिसरी शेजारीण’
“तुमचा कुकर उडाला बघा.. कसला मोठा आवाज झाला.. सगळ्या घरभर भातवरण झालंय..” 🙄🙄🙄
तसं दोघींचं हृदय गपकन बंद पडायला येतं.. पळतच दोघी तीच घर गाठतात…😱😳😱
बघतात तर पाहुण्यांसाठी बनवलेला वरण भात वरती सिलिंग खात होत.. आणि दारापासून वरणाचा सडा पडला होता तो वेगळाच..!.
दुसरी सावकाश पावलं टाकत आत शिरते आणि बहिणीला विचारते,
दुसरी- “काय ग कसं झालं हे?” 😳
“काय माहीत ताई… ” 😬
पहिली- ” नशीब बाकीचे सगळे बाहेर होते. लागलं नाही ना तुम्हाला?” 😷
“नाही लागलं” 🤐
एव्हाना दुसरीने पाणी टाकून फरशी पूसायला सुरुवात केली..
पहिली- “घाबरला असाल ना तुम्ही? बापरे किती डेंजर झालं असत” 😔
“नाही तर… मला सवय आहे..” 😒
दोन्ही शेजारणी चमकून..
“म्हणजे???” 😳😳😳😳😳
“या आधी पण मी कुकर उडवलेत असे..” 😈
दोघी जणी किंचाळून… “किती???” 😧😧
“तीन” 😚
“म्हणजे हा…. चौथा…”🙄😑😐
दोन्ही शेजारणी तीच उत्तर ऐकून गार पडल्या…
पहिली- “वाह.. बाकी हे टॅलेंट पण भारी आहे… तुम्हाला ना पाकड्यांच्या बॉर्डरवर पाठवायला पाहिजे खूप सारे कुकर देऊन.. त्याचा तिकडे खरा उपयोग होईल.. “🙄
एवढ्यात दुसरी फडक फेकून देत जोरात किंचाळली-
“बाहेर घेऊन जा हिला आत्ताच.. नाहीतर हिलाच उडवीन मी” 😤😤

Comment Time...!